सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुरुड जंजिरा : बाबुराव गोळे
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड चे समुद्र किनारे फुलले असून सरत्या वर्षाच्या विकेंडला मुरुडसह जंजिरा किल्ला, पर्यटनात जगाच्या नकाशावर नावारूपाला आलेल्या काशिद-बिच वर मौज मजा मस्ती करत पर्यटकांनी उंट घोडा, पॅरेसेलिंग बोट, स्पीड बाईक सफरीचा आनंद लुटला.
काशिद-बिच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते.पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, पँरेसेलिंगबोट,बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करत आहेत.याठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या, वेळप्रसंगी ठिकठिकाणी ट्रँफिक जँमलाही सामोरे जावे लागत असल्याचे चित्र रविवारी विकेंड ला दिसून येत होते.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड, स्थानिक, स्टाँलधारक,ग्रामपंचायत चे सहकार्य लाभते. पोलीस ही आपली कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडतात.ग्रामपंचायत तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, श्रीसदस्य, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने समुद्र किनारा चकाचक करण्यात येत असतो.सरत्या २०२४ सालाला निरोप देण्यासाठी व सन.२०२५ चे स्वागत करण्यासाठी रविवारी विकेंड ला काशिद-बिच समुद्र किना-यावर मौज मजा मस्ती करत उंट,घोडा,पॅरेसेलिंग बोट, स्पीड बाईक सफरीचा आनंद लुटला !