Baramati News l दिपक जाधव l ई पीक पहाणी ॲप म्हणजे असून अडचण नसून खोळंबा : ई पीक पाहणी करताना ॲप दाखवतंय दुसऱ्याची शेती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----  
सुपे : दिपक जाधव 
शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतातील विविध पिकांच्या नोंदणी शासनाच्या ई पीक पहाणी ॲप मधुन स्वतः करायची आहे. मात्र स्वत: च्या शेतात जावुनही ई पीक पहाणी होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.  
           पानसरेवाडी येथील शेतकऱ्यांनी स्वत: च्या शेतात जावुन ई पीक पहाणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वत:च्या गटामध्ये ई पीक पहाणी करीत असताना शेत २ हजार ५०० मिटरवर असल्याचे दाखवत होते. त्यामुळे ई पीक पहाणी होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. 
             मागिल काही महिण्यापुर्वी शेतकरी ई पीक पहाणी करीत असताना ॲप चालत नसल्याची तक्रार येत होती. आता ॲप चालु आहे मात्र शेतकरी स्वत:च्या क्षेत्रात उभा असताना दुसऱ्याच क्षेत्रात असल्याचे दाखत आहे. त्यामुळे शासनाने यातील काही तृटी असतील त्या त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
          ई पीक पहाणी केल्यास त्वरित आपल्या सातबारा उताऱ्यावर खातेनिहाय नोंद होते. आपण आपल्या शेतात घेतलेल्या पीकांची नोंद ठेवु शकतो. तसेच या माध्यमातून आपल्या शेतातील विहीर पड, बोअरवेल, रस्ता तर बांधावरील झाडांची नोंद यामुळे ठेवता येते. तसेच पीक विमा, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे कर्ज तर अतिवृष्टीमुळे होणारे  नुकसान याची नुकसान भरपाई मिळु शकते. मात्र ॲप चालु न झाल्यास शेतकऱ्यांना लाभापासुन वंचित ठेवु नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
        दरम्यान बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तालुक्यातील अनेक गावातील नकाशांमध्ये अडचनी येत आहेत. त्यामुळे ॲप चुकीची माहिती दर्शवित आहेत. यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना कळवली आहे. त्यामुळे काही दिवसात नकाशे दुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी ई पीक पहाणी करावी असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. 
   .....................................
To Top