सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
बेलसर वाघापूर रस्त्यावर पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
जरेवाडी येथून सर्व भाविक जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी सोमवारी निघाले होते. मात्र देवदर्शना पूर्वीच पहाटे अडीच वाजता हा अपघात झाला. पिकअप या गाडीतील जितेंद्र तोतरे, आशाबाई जरे या दोघांचा या दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.