सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर -मांढरदेवी ता.भोर रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्ता करण्याचे काम सुरू असून या कामाला ये -जा करणारे वाहनांचा अडथळा निर्माण होत असल्याने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्या मागणीनुसार कापूरव्होळ - भोर -मांढरदेवी रस्ता यात्रेकरूनसाठी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.
श्री क्षेत्र मांढरदेवी काळेश्वरी देवीची यात्रा १२ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे.मांढरदेवी यात्रेसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक काळेश्वरी देवीचे दर्शनासाठी येत असतात. सदर यात्रा कालावधीमधील काळेश्वरी देवीचे दर्शनासाठी भोर, आंबाडेमार्गे आंबाडखींड घाटातून काळेश्वरी देवीला जाणा-या भाविकांची संख्या हि मोठ्या प्रमाणावर असते. सद्यस्थितीमध्ये भोर ते मांढरदेवी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्ता तयार करणेचे काम सरु असून सदर रस्त्याचा बहुतांश भाग हा नादुरुस्त स्वरुपाचा तसेच घाट रस्त्यामध्ये अद्याप ब-याच ठिकाणी सुरक्षा कठडे नसलेचे व नादुरुत्त स्वरुपात असून सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण उपाय योजना पूर्ण झालेल्या नाहीत.रस्त्यावर वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. आंबाडखिंड घाट मांढरदेवी प्रारंभ पर्यंत सिंगल रोड आहे.घाट प्रारंभ ते घाटमध्य भागापर्यंत रोडचे काम केलेले नाही.त्यामुळे सदरचा रस्ता हा अरुंद घाटाच्या मध्यभागी नवीन रोडचे काम सुरु आहे.त्याठिकाणी सिंगल रोडची वाहतुक सुरु आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ शकते तसेच त्याठिकाणी कोगत्याही प्रकारचे सरंक्षक कठडे नाहीत.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर रस्ता बंद करण्यात आला आहे.