सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-निगुडघर मार्गावरील आपटी ता.भोर येथील वळणावर दुचाकीला अपघात होऊन दुचाकी वरील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.२२ सायंकाळच्या वेळी घडली. अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.
निगुडघर-भोर मार्गावरून दुचाकीवरील वृद्ध भोरबाजूकडे येत असताना दुचाकीचा अपघात होऊन घटनास्थळी दुचाकी चालक मृत झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. संबंधित मृत वृद्ध बसरापूर ता.भोर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.