सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
सोनोरी ( ता. पुरंदर ) येथील रहिवासी मार्तंड महादेव काळे यांच्या वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पाठीमागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतरुंडे असा मोठा परिवार आहे.
अप्पा या नावाने ते सर्वत्र परिचित होते. राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सक्रीय असून नावलौकिक प्राप्त म्हणून त्यांचा परिचय आहे.
तालुक्यातील विविध मान्यवरांनी त्यांच्या अंत्य संस्कारास उपस्थित राहून श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव काळे, सोनोरी गावचे आदर्श माजी सरपंच बाळासाहेब काळे यांचे ते वडील होत. तर पुरंदर तालुक्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप अॅड. सृष्टी काळे यांचे ते आजे सासरे होत.