सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर- कापूरहोळ मार्गावरील हारतळी ता.खंडाळा पुलाखाली बेवारस बॉडी पाण्याच्या बाहेर आल्याचे स्थानिकांकडून माहिती मिळाली.घटनास्थळी शिरवळ पोलीस दाखल झाले असून बेवारस मृतदेह शिरवळ पोलीस तसेच भोईराज जल आपत्ती संघ भोर यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आला.
सोमवार दि.९ रोजी तरुणाचा बेवारस मृतदेह हारतळी येथील पुला खालील पाण्याशेजारी असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना स्थानिकांकडून देण्यात आली. तात्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार तुषार कुंभार ,दत्तात्रय धायगुडे ,मिलिंद बोराटे तसेच जितेंद्र शिंदे यांनी दाखल होत ३५ ते ४० वयाचा पुरुष असलेल्या मृतदेह भोईराज जलआपत्ती संघ भोर उमाकांत गुजर, शंभू सागळे ,जगन शिर्के ,रवी कांबळे यांच्या मदतीने बाहेर काढून पुढील तपास सुरू केला आहे.