सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोहोळ : प्रतिनिधी
सोलापुरातील मोहोळ येथे अंगावर काटा आणणारी घटना घडलीय. चार वर्षाच्या लहान बहिणीला कडेवर घेत ट्रॅक्टरवर चढताना मोठ्या बहिणीचा पाय गेअरवर पडल्यानं ट्रॅक्टर दोन्ही बहिणींच्या अंगावरून गेला.
या अपघातात दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत ऊस तोडीच्या फडात शनिवारी (दि.७ डिसेंबर) रोजी ही घटना घडली. निता राजु राठोड आणि अतिश्री राजु राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत. मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलींचे पालक त्यांच्या पाच मुली आणि एक मुलगा अशा आठ जणांचा ऊसतोड मजुरी करून उदरनिर्वाह करतात.
ऊसाच्या बांधांवर असणारा ट्रॅक्टर चालकाने तसाच सुरु ठेवल्यामुळे निष्काळजीपणातून हा अपघात झाल्याची तक्रार या मुलींची आई शानुबाई राठोड यांनी केली होती. यावरून मोहोळ पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. ऊसतोडीच्या फडात काम करताना आपल्या चार वर्षांच्या बहिणीला कडेवर घेत मोठी बहीण निता राठोड वय २० हिने चालू ट्रॅक्टरवर चढत होती. लहान अतिश्रीला घेऊन चढताना निताचा पाय ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला. यामुळे ट्रॅक्टर पुढे गेल्याने दोन्ही बहिणी खाली पडल्या. ट्रॅक्टरखाली आल्यानं दोन्ही बहिणी चालू असलेला ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच मत झाल्या.