सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील जिंती येथील नीरा नदीच्या पात्रात असेलेले बेटावरील अवैध मातीचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या दोन वर्षीपासुन सुरू फलटण विभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी रात्रीच्या वेळी अनेकदा कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न सातत्याने सुरू आहे. परंतु वडगांव पोलिसांनी दि.२४ डिसेंबरला रात्री फलटण तालुक्यातील अवैध माती उपसा करणाऱ्या व्यवसायिकांचे एकुण १ जेसीबी, ४ हायवा गाड्या पकडल्या होत्या. परंतु पोलिसांनी तोडपाणी करुन यामधील जेसीबी व २ हायवा गाड्या सोडून देण्याचे काम केल्याने फलटण व बारामती तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तसेच घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी तात्काळ बारामती तहसीलदार गणेश शिंदे यांना कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आले. परंतु वडगांव पोलीस ठाण्याचा प्रताप पाहताच दोन्ही तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नीरा नदीच्या बेटावर हायवा गाड्या व जेसीबी सोडल्याने वडगांव ग्रामीण पोलिसांनी कार्यवाही न करता काही वाहने सोडून देण्यात आलेले चित्र स्पष्ट दिसून येत असल्याचे चर्चा होत आहे. वडगांव ग्रामीण पोलीसांचे काम रात्रीस..खेळ चाले चित्र दिसून येत आहे असा अनुभव फलटण, बारामती मध्ये पाहिला मिळाला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गृह विभाग असताना तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यात असा प्रकार होत असेल तर अशा पोलीस अधिकार्यांच्यावर कारवाई होत नसल्याने अशा प्रकार रोज सुरू होत राहील. नीरा नदीच्या बेटावरील अवैध मातीचा पंचनामा केला तर ३ ते ४ हजार ब्रासचा होईल. यामध्ये शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळेल अशी भावना नागरिकांतून होत आहे.