सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नवी मुंबई : गणेश धनावडे
कळंबोली-मेरीडाईन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ३२ ट्रेलर वाहनाचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता ३२ हजाराची मागणी केल्याप्रकरणी पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी बासरे यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच ही समाजाला लागलेली एक कीड आहे. बक्कल पगार असतांनाही शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाच स्विकारली जात आहे. त्यात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय अग्रेसर असल्याचे सोमवारी झालेल्या कारवाईत दिसून आले आहे. मेरीडाईन कंपनीच्या ३२ ट्रेलरचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे ३२ गाड्यांचे ३२ हजार रुपयाची मागणी आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदिप बासरे यांनी केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याकडे तक्रारदाराने रितसर तक्रार दाखल केली होती.