Baramati Breaking l गडदरवाडी येथे मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला : लांडग्यांकडून १४ मेंढ्यांचा फडश्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
गडदरवाडी ता.बारामती येथील रामा लिंबा हाके वय ५५ रा.  गडदरवाडी या मेंढपाळाच्या वडघ्यावर रात्री लांडग्यांनी हल्ला करून १४ बकरी फस्त केली आहेत. 
       नेहमीप्रमाणे दिवसभर निंबुत व गडदरवाडी परिसरात मेंढ्यांची चराई करून सायंकाळी सहा वाजता हाकेवस्ती नजीक असणाऱ्या शेजारील रानात मेंढ्या बसायला असतात. रानात बसवल्यानंतर मेंढ्यांना बाजूने बांबू ठोकून वाघर चढवून त्याची राखण केली जाते मध्यरात्री दोनच्या सुमारास लांडग्या सदृश हिंस्र प्राण्याने वाघर तोडून कळपातील १४ मेंढ्यांचा फडशा पडला. मेंढ्यांना राखण करणारे लिंबा हाके कुत्र्याच्या भुंकण्याने उठल्यानंतर लांडग्यांनी पळ काढला तोपर्यंत लांडग्यांनी १४ बकऱ्यांचा फडशा पाडला होता. पहाटे शेजारील उसामध्ये बघितले असता चार कोकरी मृत अवस्थेत आढळून आल्या व दोन कोकरी आठ मेंढ्या गायब झालेली दिसून आली, मेंढ्या पालन करून आपला उदरहनिर्वाह करणाऱ्या या मेंढपाळावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मागील काही दिवसापूर्वी चौधरवाडी नजीक एका मेंढपाळांच्या वाडग्यावर हल्ला करून दहा ते बारा मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. शासन दरबारी या मेंढपाळांना सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी येथील मेंढपाळांनी केली आहे.
To Top