सुपे परगणा l दिपक जाधव l 'त्याने' आठ गावाच्या मंदीरातील पितळी घंटा व समई चोरल्या : सुपे पोलिसांनी चोरट्याला पकडून मुद्देमाल केला हस्तगत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे पोलीस स्टेशनंतर्गत असणाऱ्या आठ गावातील मंदीराच्या पितळी घंटा, समई चोराला पकडुन सुमारे ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची दमदार कामगिरी सुपे पोलीस स्टेशनने केली आहे. 
         बारामतीचे विभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, या पोलीस स्टेशनंतर्गत असणाऱ्या वढाणे, मोरगाव, तरडोली, खंडुखैरेवाडी, काऱ्हाटी, दंडवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी या आठ गावातील मारूती मंदिर, महादेव मंदिर, जनाई मंदिर, सावतामाळी महाराज मंदिर, बाबीर मंदिर आदी मंदिरातील ११ पितळी घंटा व दोन समई चोरीला गेल्या होत्या. 
        त्यानुसार येथील सहायक पोलीस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे विधीसंघर्ष बालकाने ही चोरी केल्याची माहिती मिळुन आली. त्यानुसार त्यास ताब्यात घेवुन मंदिरातुन चोरीला गेलेल्या पितळी घंटा व समई बाबत चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडुन ११ पितळी घंटा आणि २ समई असा सुमारे ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याच्यावर १ दखलपात्र आणि ८ अदखलपात्र असे एकुण ९ गुन्हे उघडकिस करण्यात सुपे पोलीसांना यश आले आहे. तर त्यातील एक यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याचे सपोनी नवसरे यांनी सांगितले. तर अधिक तपास पोलीस हवालदार एस. एस. लोंढे  करीत आहेत.
      सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, रविंद्र मोहरकर, पो. हवालदार संदिप लोंढे, रूपेश साळुंखे, राहुल भाग्यवंत, पो. कॉ. किसन ताडगे, महादेव साळुंके, पो. कॉ. तुषार जैनक यांनी केली आहे.
      यावेळी राठोड पत्रकारांशी म्हणाले की मंदीरातील मुख्य व्यवस्थापकांनी आपआपल्या मंदीरातील चोरीला गेलेल्या वस्तुंची तात्काळ माहिती द्यावी व पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन राठोड यांनी केले. 
       ...............................................
To Top