सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे डॉ. जयकर व्याख्यानमाला दि.१७ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली व यशस्वीपणे पार पडली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस.बी.सुर्यवंशी यांनी पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी व मान्यवरांनी वृक्ष संजीवनी देऊन केले. व्याख्यानमालेेस उपप्राचार्य प्रा. बनसोडे डी. वी.तसेच सर्व विभागप्रमुख ,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प प्रा. विक्रम अरने यांनी ' स्पर्धा परीक्षा ' या विषयावर व्याख्यान देऊन गुंफले. दुसरे पुष्प प्रा. मारुती कारंडे यांनी ' हसता खेळता माणूस बनवूया ' या विषयावर व्याख्यान देऊन गुंफले.
तिसरे व अंतिम पुष्प प्रा. डॉ. प्रसाद नरसिंह जोशी यांनी ' स्वा. विनायक सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन ' या विषयावर व्याख्यान देऊन गुंफले. महाविद्यालयाच्या केंद्र कार्यवाह प्रा.माधुरी भांडवलकर यांनी व्याख्यानमालेचे आयोजन केले व प्रा.राजेश निकाळजे, प्रा.प्राजक्ता अडसूळ यांनी सुत्र संचलन केले व प्रा.सुनीता घाडगे, प्रा. पुजा चव्हाण यांनी वक्त्यांचे आभार मानले. व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी लागणारे मार्गदर्शन लाभले.
व्याख्यानमालेसाठी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर व सर्व संचालक मंडळ ,तसेच संस्थेचे सचिव भारत खोमणे यांचे मार्गदर्शन लाभले.