Pune News l मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले : पुण्यातील केसनंद फाट्याजवळील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाघोली : प्रतिनिधी
पुण्यातील वाघोली नजीक केसनंद फाट्याजवळ एक धक्कादायक घटना घडली. एका मद्यधुंद डंपर चालकाने तब्बल नऊ जणांना चिरडल्याची घटना घडली.
         यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. अशातच डंपर चालकाने धडक दिल्यानंतर चिमुरड्यांना घेऊन जातानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पुण्यात मध्यरात्री वाघोलीजवळच्या केसनंद फाट्यावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर काही नागरिक मदतीला धावले अन् जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती केलं. काही लोक जखमी बालकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना सीसीटीव्ही दिसत आहे. अपघातात जखमी झालेले स्थलांतरित कामगार होते, अशी माहिती समोर आली आहे.
To Top