Indapaur Breaking l सत्यजित रणवरे l इंदापूरमध्ये ३३ वर्षीय विवाहित महिलेचा निर्घृण खून : डोक्यावर, छातीवर, पोटावर व हातावर केले चाकूने वार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : सत्यजित रणवरे
इंदापूरमध्ये महिलेच्या डोक्यात, पोटावर, छातीवर, हातावर चाकूने वार करून खुन करण्यात आला आहे.
          सुनिता दादाराव शेंडे (वय ३३ वर्षे) असे खून झालेल्या महिलेचे नांव असून सदरची घटना ०४ डिसेंबर रोजी रात्री ०८:३० वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडखाली घडली आहे. हि महिला इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी गावातील शेंडेवस्ती येथील रहिवासी असून घडलेल्या घटने बद्दलची‌ हकीकत अशी आहे की मयत महिलेचा पती दादाराव निवृत्ती शेंडे यांच्या ओळखीचा इसम ज्ञानेश्वर बबन रासकर यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे शेंडे यांच्या पत्नीच्या डोक्यात, पोटावर, छातीवर, हातावर चाकूने वार केले.यात सुनिता दादाराव शेंडे यांचा मृत्यू झाला असून
याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर , रा. सुरवड ता. इंदापुर जि.पुणे याच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पहाटे ०४:००वाजणेच्या सुमारास आरोपी रासकर याला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
 सदरील गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक गावडे करीत आहेत.
To Top