भले शाब्बास l 'सोमेश्वर स्मॅशर्स' ठरला यादगार बारामती कप 0.2 उपविजेता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती येथे नुकतीच  यादगार बारामती कप 0.2 ही नामांकित टेनिस  साखळी स्पर्धा पार पडली.
       मोईन बागवान व अक्षय कांबळे यांच्या युवा क्रांती जनकल्याण संघटना व  फुल अँड फायनल ग्रुप ने भरवलेल्या स्पर्धेत १४ संघाने सहभाग घेतला होता.
सोमेश्वर परिसरातील बहुतांश खेळाडूंना एकत्र घेत जीतुभैया सकुंडे, दत्तात्रय सोनवणे , रविंद्र होळकर व शशिकांत जेधे यांनी सोमेश्वर स्मॅशर्स संघ उभारला.
 जिद्द ,चिकाटी , सांघिक भावना जोपासत अनुभवी व नवीन खेळाडू यांनी एकत्रित अत्यंत चमकदार कामगिरी केल्यामुळे उपविजेतेपद पटकावले. ६२ हजार रुपये व चषक हे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले         साखळीतील सहा पैकी चार सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश मिळवला. कोणताही मोठा चेहरा संघात नसताना ही कामगिरी कौतुकास्पद ठरली. बाद फेरीत देखील लागोपाठ दोन सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला . अंतिम सामन्यात लढत चांगली देत रंगतदार सामन्यात थोडक्यात हार पदरी पडली तरी सोमेश्वर स्मॅशर्स ने बारामती टेनिस क्रिकेट मध्ये दखलपात्र कामगिरी करत अनेक चाहते , क्रिकेट विश्लेषक , क्रिकेट प्रेमी , व सोमेश्वर - बारामती परिसरातील आजी माजी खेळाडू कडून वाहवा मिळवली. 
          सागर काळकुटे , साई गायकवाड , रामा सोले, चैतन्य गुलदगड यांनी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. तर निखिल भोसले , जितुभैया सकुंडे व दानिश सय्यद यांनी फलंदाजी सोबत उत्कृष्ट गोलंदाजी करत अष्टपैलू कामगिरी केली. तर रवींद्र होळकर , दत्तात्रय सोनवणे , यांनी गोलंदाजीत योगदान दिले.
शशिकांत जेधे यांनी अत्यंत चपळाईने देखणे क्षेत्ररक्षण करत संघात चैतन्य निर्माण केले. निखिल फरांदे , राहुल लकडे , किरण गाढवे यांनी उत्तम साथ दिली.
दानिश सय्यद यास  उगवता तारा (इमर्जींग प्लेअर ऑफ टुर्नामेंट) या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सांघिक कामगिरी  , शिस्तबध्द खेळ , आणि दबावात उत्तम कामगिरी करत सोमेश्वर स्मॅशर्स संघ खऱ्या अर्थाने डार्क हॉर्स ठरत उपविजेता ठरला.
सोमेश्वर स्मॅशर्स संघ -
1. जितेंद्र सकुंडे (C)-वाघळवाडी 
2.दत्तात्रय सोनवणे - मुरूम
3.रविंद्र होळकर - होळ 
4.शशिकांत जेधे - वाणेवाडी 
5.निखिल भोसले - वाणेवाडी 
6.निखिल फरांदे - मुरूम 
7.साई गायकवाड (W)- चोपडज
8.राहुल लकडे - पांढरवस्ती 
9.किरण गाढवे - होळ 
10 .चैतन्य गुलदगड 
11.दानिश सय्यद- वाघळवाडी 
12.गणेश भोसले - वाघळवाडी 
13.सागर काळकुटे - डोर्लेवाडी 
14. श्रीराम सोले- माळेगाव
To Top