भले शाब्बास l 'सोमेश्वर स्मॅशर्स' ठरला यादगार बारामती कप 0.2 चा उपविजेता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती येथे नुकतीच  यादगार बारामती कप 0.2 ही नामांकित टेनिस  साखळी स्पर्धा पार पडली.
       मोईन बागवान व अक्षय कांबळे यांच्या युवा क्रांती जनकल्याण संघटना व  फुल अँड फायनल ग्रुप ने भरवलेल्या स्पर्धेत १४ संघाने सहभाग घेतला होता.
सोमेश्वर परिसरातील बहुतांश खेळाडूंना एकत्र घेत जीतुभैया सकुंडे, दत्तात्रय सोनवणे , रविंद्र होळकर व शशिकांत जेधे यांनी सोमेश्वर स्मॅशर्स संघ उभारला.
 जिद्द ,चिकाटी , सांघिक भावना जोपासत अनुभवी व नवीन खेळाडू यांनी एकत्रित अत्यंत चमकदार कामगिरी केल्यामुळे उपविजेतेपद पटकावले. ६२ हजार रुपये व चषक हे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले         साखळीतील सहा पैकी चार सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश मिळवला. कोणताही मोठा चेहरा संघात नसताना ही कामगिरी कौतुकास्पद ठरली. बाद फेरीत देखील लागोपाठ दोन सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला . अंतिम सामन्यात लढत चांगली देत रंगतदार सामन्यात थोडक्यात हार पदरी पडली तरी सोमेश्वर स्मॅशर्स ने बारामती टेनिस क्रिकेट मध्ये दखलपात्र कामगिरी करत अनेक चाहते , क्रिकेट विश्लेषक , क्रिकेट प्रेमी , व सोमेश्वर - बारामती परिसरातील आजी माजी खेळाडू कडून वाहवा मिळवली. 
          सागर काळकुटे , साई गायकवाड , रामा सोले, चैतन्य गुलदगड यांनी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. तर निखिल भोसले , जितुभैया सकुंडे व दानिश सय्यद यांनी फलंदाजी सोबत उत्कृष्ट गोलंदाजी करत अष्टपैलू कामगिरी केली. तर रवींद्र होळकर , दत्तात्रय सोनवणे , यांनी गोलंदाजीत योगदान दिले.
To Top