सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
राजेवाडी (ता. पुरंदर )येथील प्रगतशील शेतकरी दशरथ सोमजी राऊत उर्फ नाना (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी रामदास राऊत, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीकांतशेठ राऊत, राजेवाडीचे माजी सरपंच शरद राऊत व गृहिणी आनंदीबाई जगताप यांचे ते वडील होत.