सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
पुरंदर ( निरा) येथील संतोष गजानन गायकवाड वय ५२ यांचं अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले.
आदर्श शिक्षिका कै.जयश्री गायकवाड यांचे ते थोरले चिरंजीव तर निरा येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश गायकवाड यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या पश्चात एक भाऊ ,बहीण, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. अंत्यविधी सायंकाळी सहा वाजता निरा ता पुरंदर येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे.