सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५ ९३५ खटले निकाली लागले असून २६ कोटी ८५ लाख १०१६ रुपयांची वसुली झाली.
शनिवारी बारामती चे जिल्हा न्यायाधीश श्री व्ही.सी बर्डे यांचे अध्यक्षतेखाली बारामती वकील संघटना व विधी सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमाने हे राष्ट्रीय लोक न्यायालय पार पडले. यामध्ये बँक वसुलीच्या दाखलपूर्व व दाखल अशी २१२ प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये १३ कोटी १३ लाख ८०४७ रुपयांची वसुली झाली. मोटार अपघात चे एकूण ३५ खटले निकाली निघाले त्यात ४ कोटी ७८ लाख ६९५८ रुपयांची वसुली झाली.महसूल चे ३१८१ खटले निकाली निघाले त्यात १ कोटी ११ लाख ६३३८ रुपयांची वसुली झाली तर पाणीपुरवठा बिलासंबंधी २३८२ खटल्यात २ कोटी १८ लाख ९३८२ रुपयांची वसुली झाली. एकूण ५९३७ खटल्यात २६ कोटी ८५ लाख १०१६ रुपयांची वसुली या राष्ट्रीय लोकन्यायालयात झाली.
बारामती वकील संघटना अध्यक्ष अँड प्रभाकर बर्डे व उपाध्यक्ष अँड सचिन कोकणे यांचेसह वकील संघटनेचे सदस्य यावेळी हजर होते. जिल्हा न्यायाधीश १ श्री व्ही.सी बर्डे,तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस आर पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आय ए आर मरछिया,एन आर वानखेडे,प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश ओ एम माळी, व्ही व्ही देशमुख ई नी पॅनल जज म्हणून काम पाहिले.तर समन्वयक म्हणून मिलिंद देऊळगावकर यानी काम पाहिले.
नियमीत होणाऱ्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त पक्षकारांनी आपले दावे समन्वयाने सोडवल्यास अमूल्य वेळेबरोबर पैशाची देखील बचत होते असे अनेक फायदे होतात त्यामुळे पक्षकारांनी यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे मत यावेळी जिल्हा न्यायाधीश व्हीसी बर्डे यानी व्यक्त केले.