Phaltan News l प्रशांत ढावरे l पाया पडतो... पण, आपली शाळा वाचवा...! पाडेगाव शाळा व्यवस्थापन समितीची ग्रामस्थांना साद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
पाडेगाव ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली आहे. शाळेची पडझड, इमारतीची दयनीय अवस्था यामध्ये मुलांच्या शैक्षणिक शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. याबाबत पाडेगाव जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत ग्रामस्थांना साद घातली आहे.
       याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पत्रात म्हणटले आहे की, पाडेगाव (ता. फलटण) येथील सर्व पालक व ग्रामस्थांना सप्रेम नमस्कार....
एक आदर्श पिढी घडविण्यासाठी कशाची आवश्यकता आहे ? असा प्रश्न विचारला तर उत्तर भलेमोठे येईल. पण, या उत्तरात 'चांगली शाळा' हा भाग नक्की समाविष्ट असेल. मित्रांनो, आपली गावठाणातील १९३७ साली उभी राहिलेली शाळा आता अखेरचे क्षण मोजत आहे. आज हे सांगण्याचा उद्देश्य हा की, एकदा शाळेत येऊन पहा.. शिक्षकांनी स्वखर्चातून बाहेरून रंगरंगोटी केल्याने शाळा बोलकी दिसेल पण पडझड झालेल्या वर्गखोल्या काळजाचा ठाव चुकवतील.. पडलेल्या शौचालयात सापांची पडलेली कातन मनात भीती निर्माण करेल. पावसाळ्यात मैदानावर महिनोन महिने साचलेले पाणी आणि त्यावर झालेली डासांची पैदास यांमुळे जेंव्हा मुले आजारी पडताना दिसतात तेंव्हा डोळ्यात पाणी येते. मुतारी व शौचालय नसल्याने उघड्यावर जाणारी मुले मुली पाहिल्या की, प्रचंड चीड निर्माण होते. वर्गात धड पुरेसा प्रकाश देखील येत नाही. मोकळी हवा येत नाही.
       मित्रांनो, अशा परिस्थितीत आपल्या गावातील भावी पिढी गावठाणाच्या शाळेत शिकत आहे. शाळा दर्जेदार व्हावी यासाठी आम्ही अनेकदा ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार केला. पण, शाळेच्या इमारतीची जागा शाळेच्या मालकीची नसल्याने काहीही अनुदान मिळाले नाही. गेल्या अनेक दशकांपासून हि परिस्थिती अशीच आहे. किमान आता तरी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काहीतरी बदल करण्याची गरज आहे. आपल्या शाळेची अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. मालकी हक्काचा प्रश्न निकाली लागत नसेल तर शाळेसाठी नवीन जागा उपलब्ध करण्यासाठी सगळ्यांनी झटायला हवे. आपली शाळा आपला स्वाभिमान आहे. उद्याचे आदर्श नागरिक तयार करणारी आपली शाळा आपणच जपायला हवी...
To Top