सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिक्रापूर : प्रतिनिधी
शिक्रापूरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी दि. १ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
मालमत्ता अथवा अनैतिक संबंधाच्या कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोर यांची नावे व संख्या समजली नसून पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली.
दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. यानंतर त्यांना पुणे येथे खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.