सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील आमराई येथील विहिरीत पडलेल्या बैलाला एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर नगरपालिका कर्मचारी तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याने जीवदान मिळाले.
विहिरी शेजारी बैल चालत असताना अचानक पाय घसरून विहिरीत पडला काही वेळाने बैल ओरडण्याचा आवाज आल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेला तात्काळ कळवले.नगरपालिका कर्मचारी,अग्निशमन विभाग तसेच सह्याद्री रेस्क्यू टीम भोर यांनी धाव घेत विहिरीतील बैलाला बाहेर काढले.