Purandar Breaking l कुटुंबाला गावी भेटण्यासाठी निघालेल्या युवकावर काळाचा घाला : उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने मांडकीच्या युवकाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
भोर तालुक्यातील सारोळा नजीक न्हावी-भोंगवली येथे ऊसाचे भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील सुधीर शिवाजी जगताप वय ३५ याचा मृत्यू झाला आहे. 
            सुधीर हा पुणे येथे एका कंपनीत कामाला आहेत, दिवस पाळीचे काम उरकून आपल्या टू व्हीलर वर कामानिमित्त गावी निघाला होता. भोर नजीक सारोळा येथे रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पुढून आलेल्या गाडीच्या प्रकाशामुळे त्याला न दिसलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक झाली यामध्ये तो गंभीर जखमी झाला, नागरिकांनी जवळच्या जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन लहान मुले आहेत, आई वडील गावी शेती करतात त्यांची भेट घेण्यासाठी तो आपल्या मूळ गावी मांडकी येथे निघाला होता प्रवासादरम्यानच त्याच्यावर काळाची झडप बसली असून यामध्ये त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण मांडकी गावावर शोक कळा पसरली.
To Top