Big Breaking News l गणेश धनावडे l 'झुकेगा नही साला'.. म्हणणारा अल्लू अर्जुन पोलिसांपुढे झुकला : 'या' कारणासाठी केली अल्लू अर्जुनाला पोलिसांनी अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नवी मुंबई : गणेश धनावडे 
पुष्पा २’च्या प्रीमिअर शोदरम्यान हैदराबादमधील एका चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या आहेत. अल्लू अर्जुनला अटक झाल्याची माहिती आहे.
              आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत दोन चाहत्यांचा मत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचं सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, असं पोलिसांनी सांगितलं.
To Top