सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दौंड : उमेश दुबे
मालवाहतूक ट्रक चालक हे जेजुरी वरून माल भरून बेंगलोर येथे घेऊन जात असताना, एका बुलेरो गाडीतील सहा अनोळखी इसमाने ट्रकला एक किलोमीटर पाठीमागून पाठलाग करीत पुणे सोलापूर हायवे वरती गाडी आडवी लावून ट्रक मालक व चालक यास लोखंडी टॉमी व लाताबुक्याने मारहाण करून ट्रक चालक यांच्या खिशातील ३३ हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरूले. ही घटना दि. ७ रोजी घडली.
अनोळखी इसम त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या बुलेरो गाडीमध्ये बसून राशींन च्या दिशेने फरार झाले. सदरची तक्रार प्राप्त होताच दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. त्यांनतर तात्काळ पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पो.उप. नि रुपेश कदम व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करून आरोपी शोध करिता रवाना केले. गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित बुलेरो एम एच ४२ एएस ६६५८ व संशयित तौफिक रियाज शेख, विक्रम बाळासो माडगे दोन्ही रा. भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे, शरद अशोक धेंडे, हनुमंत रामभाऊ गायकवाड, अमोल गौतम गायकवाड व भिकाजी वाल्मीक धेंडे वरील चारही राहणार जींति तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांना जामखेड येथील कला केंद्र येथून ताब्यात घतले.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती गणेश बिरादार , उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग बापूराव दडस व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पो.उप. नि .रुपेश कदम सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, मलगुंडे, पोलिस हवालदार आय आर पठाण, संजय नगरे, नवनाथ भागवत, अमोल नरुटे गजानन शिंदे, चा.सहा. फौं.साळुंखे, मोघे अंमलदार सागर म्हेत्रे, रमेश कर्चे यांनी केली आहे.