Purandar News l नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा घुमणार कांदा लिलावाचा आवाज : 'या' तारखेला पार पाडणार पाहिला लिलाव

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------- 
नीरा : विजय लकडे 
पुरंदर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दत्त जयंतीच्या मुहूर्तावर शनिवारपासून दि. १४ पासून कांदा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती सभापती शरद जगताप यांनी दिली. 
         बाजार समितीमध्ये गेल्या वर्षीपासून कांदा लिलाव चालू झाला होता त्याला शेतकऱ्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता यावर्षीचा कांदा लिलाव शनिवारपासून सुरू होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद जगताप यांनी दिली मंगळवारी दि. १० रोजी झालेल्या व्यापारी व संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दत्त जयंतीच्या मुहूर्तावर कांदा लिलाव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली बारामती व पुरंदर तालुक्याचा कार्यक्षेत्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची अडचण ओळखून नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत गेल्या वर्षी कांदा लिलाव चालू झाला होता त्याला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद देखील शेतकऱ्याकडून मिळाला होता यावर्षीचा कांदा काढणी शेतकऱ्यांच्याकडून चालू झाली असल्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील कांदा लिलाव चालू करण्याची मागणी होत होती, त्याला अनुसरून संचालक मंडळांनी हा निर्णय घेतला आहे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी आपला कांदा निरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन शरद जगताप यांनी  केले 
आठवड्यातून एकच दिवस शनिवारी कांद्याचे लिलाव केले जातील त्याच दिवशी संध्याकाळी कांद्याची पट्टी शेतकऱ्यांना देण्यात येईल,सर्व व्यवहार पारदर्शक व चोख केले जातील असे सभापती व संचालक मंडळांनी सांगितले आहे. 
यावेळी सभापती शरद जगताप संचालक अशोक निगडे, विक्रम दगडे, राजकुमार शहा, बाळासाहेब जगदाळे,सुशांत कांबळे, भाऊसाहेब गुळदगड, कांदा व्यापारी, लेखापाल नितीन कीकले, कृष्णांत खलाटे उपस्थित होते
To Top