Purandar News l आठवीत असताना एका दैनिकाच्या चित्रकला स्पर्धेत दुसरा नंबर ! आज त्याच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांचे मुंबईत भव्य प्रदर्शन : खासदार सुप्रिया सुळे यांची कौतुकाची थाप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे 
नीरा ता. ( पुरंदर ) येथील रहिवासी असलेल्या रामदास थोरात या युवकाने मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवलेल्या चित्र प्रदर्शनास बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भेट देऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.   
        लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या रामदासला इयत्ता आठवी मध्ये असताना एका दैनिकाने भरवलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होऊन दुसरा क्रमांक मिळाला आणि इथूनच त्याला चित्रकलेची आवड निर्माण झाली, आपण चित्रकलेमध्ये काहीतरी करू शकतो हा विश्वास इयत्ता दहावी मध्ये असताना आणखीनच दृढ झाला, दहावीनंतर पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन २००४ साली शिक्षण पूर्ण झाले. रामदास चा शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच खरा प्रवास चालू झाला घरची परिस्थिती जेमतेम असल्याने पुणे, बेंगलोर, मुंबई येथील बऱ्याच मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम केले , हे सर्व करत असताना चित्रकलेची आवड देखील त्याला स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे चित्रकलेमध्ये देखील त्याचा खंड पडला नाही 
आतापर्यंत रामदासची एकल तसेच सामूहिक बरीच चित्र प्रदर्शन झाली आहेत तसेच परदेशातील प्रदर्शनात सहभाग देखील घेतला आहे मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवलेले हे त्याचे तिसरे प्रदर्शन असून अनेक जणांनी या प्रदर्शनास भेटी देऊन त्याची प्रशंसा केली आहे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन रामदास च्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि मी कृतज्ञ झालो अशी भावना त्याने 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. 
         नीरा येथील रहिवासी व मुंबई येथील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये कामास असणाऱ्या रामदास च्या चित्र प्रदर्शनास निरा येथील मित्रपरिवार व निरा ग्रामस्थांनी देखील भेटी देऊन प्रशंसा केली.
To Top