सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
यावर्षी मंत्री समितीच्या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखाने उशिरा सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस तुटून जाण्यासाठी उशीर झाला आहे. डिसेंबर महिना संपत आला तरी सोमेश्वर कारखान्याचा अजून आडसाली ऊस संपला नाही. त्यातच चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून निरा डाव्या काळव्यावरील विद्युत मोटारांवर चोरट्याने डल्ला मारल्याने आता पिकांना पाणी कसे देणार म्हणून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
नीरा-मोरगाव रोड जगताप वस्ती नजीक नीरा डावा कालव्याच्या पुलाजवळ शेती सिंचनासाठी लिफ्ट करून अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती बागायत केली आहे. याच शेतकऱ्यांच्या इंजिन घरातील १० एचपी १५ एचपी व २५ एचपी च्या मोटारीवर रात्री अज्ञात चोरट्यांनी इंजिन घर फोडून डल्ला मारला आहे.
रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्याची लगबग चालू असताना या शेतकऱ्यांच्या मोटारी चोरी गेल्याने शेतकरी पूर्ण हवाल दिल झाला आहे, कारखान्याचा गळीत हंगाम चालू झाल्यामुळे ऊस भिजवण्याकडे ही शेतकऱ्यांचा कल आहे सिंचनासाठी मिळणारी रात्रीची लाईट यामुळे शेतकरी अगोदरच भयानक अवस्थेत असताना आत्ता या झालेल्या मोटर चोरीमुळे शेतकरी पूर्ण कोलमडलेला आहे। नीरा डाव्या कालव्याच्या पश्चिमेकडील व पूर्वेकडील बाजूला सात ते आठ शेतकऱ्यांच्या मोटर चोरीला गेले आहेत, काही महिन्यापूर्वी याच मोटरच्या केबल व मोटर देखील चोरीला गेल्या होत्या, त्याचा तपास अद्याप चालू असताना दुसऱ्यांदा मोटर चोरीचा दणका शेतकऱ्यांना सोसणारा नाही,अधिकचा तपास करंजेपूल पोलीस करत आहे.