Wai Breaking l एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह एकाच्या मुसक्या आवळल्या : वाई पोलीस व गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
सराईत आरोपी कुणाल सकटे याचेकडुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत केला वाई पोलीस व गुन्हे प्रकटीकरण शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई केली. 
       वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सराईत आरोपी हा वाई पोलीस ठाणे हद्दमधील रविवारपेठ मधील मांगखळी येथे विनापरवाना अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे. सदर माहिती प्राप्त होताच वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांचे पथकास सदर माहितीच्या अनुषंगाने सापळा रचुन सदर संशयित आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. प्राप्त बातमीच्या आधारे वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवारपेठ वाई मधील मांगखळी येथील मणेश्वर ओढ्याचे जवळ सापळा लावला असता सदर ठिकाणी एक इसम हा संशयित रितीने फिरतांना दिसला त्याचा वाजवी संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव कुणाल सकटे रा. रविवारपेठ वाई ता. वाई जि सातारा असे असल्याचे सांगितले त्याचेवर यापुर्वी देखील गुन्हा दाखल असल्याने तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेला १ देशी बनावटीचे पिस्टल व त्याचे पॅन्टचे खिशात २ जिवंत काडतुसे असा एकुण ६५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे. 
         सातारा जिल्हा पोलीस दलाकड्न माहे नाव्हेंबर २०२२ पासून ते आज अखेर १०७ देशी बनावटीची पिस्टल ०४ बारा बोअर बंदका, २३५ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पंगळ्या व ०४ मॅग्झीन जप्त करण्यात आलेल्या आहेत,
       सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्याम पानेगांवकर परि. पोलीस उपअधिक्षक वाई पोलीस ठाणे. सहा पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपासपथकाचे प्रमुख पोलीस उप-निरीक्षक सुधिर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक ए.बी.सुर्वे पोलीस अंमलदार १४३५ प्रसाद दुदुस्कर, पो. शि १३०२ नितीन कदम, पो. शि. २४७० राम कोळी, पो.शि ७९७ हेमंत शिंदे, पो.शि १२५५ श्रावण राठोड, पो.शि ६०६ विशाल शिंदे यांनी केली आहे. 
Tags
To Top