Solapur News l 'या' कारणासाठी मारकडवाडी ग्रामस्थांचे आज बॅलेट पेपरवर चाचणी मतदान : जानकरांना मानणाऱ्या गावातून सातपुतेंना...

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळशिरस : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीचे ग्रामस्थ उत्तम जानकर आणि मोहिते पाटलांना मानणाऱ्या गावातून भाजपच्या सातपुतेंना एवढी मतं मिळाली कशी ? मारकडवाडी ग्रामस्थांनी थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज दिले आहे. आज या गावात चाचणी मतदान होत आहे. 
      माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे आज दि. ३ डिसेंबर रोजी रबॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ईव्हीएमबाबत शंका घेत मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाची मागणी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली. यानंतर मारकडवाडी गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अशातच आमदार उत्तम जानकर आणि मारकडवाडी ग्रामस्थ मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत.
       माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तेरा हजार मताने निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही. राम सातपुते यांनी कडवी झुंज दिली. यानंतर आता जानकर समर्थकांनी मोहिते पाटलांची ताकद असताना मताधिक्य न मिळाल्याने बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय घेतला. जानकर आमदार झाले तरीही लोकशाहीसाठी ही प्रक्रिया आम्ही राबवत असल्याचे आता जानकर समर्थक सांगतात.
-------------
मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान का?
मारकडवाडीतून राम सातपुते यांना ८४३ तर उत्तम जानकरांना १००३ मतं मिळाली. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मिळाली आहेत. सातपुतेंना फक्त १०० ते १५० मते अपेक्षित होती. तर जानकरांना दीड हजार पेक्षा जास्त मतं अपेक्षित होती. हे सगळं ईव्हीएममध्ये घोळ करुन केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आणि तशी प्रक्रिया आज पार पडत आहे.
To Top