Vijay shivtare l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर गाडी आडवल्यावर पोलीसांवर विजय शिवतारे चांगलेच संतापले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
ठाणे : प्रतिनिधी
साताऱ्यातील दरे गावातून आल्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आपल्या निवासस्थानी आहेत. एकनाथ शिंदे यांनी सगळ्या बैठका रद्द केल्या असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

शिंदे गटातील आमदार एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील निवासस्थानी जात आहेत. यातच शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे हेही शिंदेंना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची गाडी अडवल्यानं ते चांगलेच भडकले.
      एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात विश्रांतीसाठी गेले होते. पण, तिथे गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडली होती. यानंतर ते रविवारी ( १ डिसेंबर) ठाण्यात आले आहेत. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी शिंदेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे माजी मंत्री विजय शिवतारे हे शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ठाण्यातील निवासस्थानी गेले होते. यावेळी निवासस्थानाच्या गेटवर पोलिसांनी शिवतारे यांची गाडी अडवली. तेव्हा, "तुम्हाला आमदार आणि माजी मंत्री ओळखता येत नाही का?" असा सवाल उपस्थित करत शिवतारेंनी पोलिसांना खडसावलं आहे.
To Top