Baramati News l रोटरी आरसीसीच्या अध्यक्षपदी संदीप जगताप तर सचिवपदी सिकंदर शेख यांची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बारामती पुरस्कृत बारामती तालुका शिक्षकांचा रोटरी कम्युनिटी कॉर्पस (RCC) ची स्थापना करण्यात आली असून या आरसीसीच्या अध्यक्षपदी बारामती तालुका मुख्याध्यापक संघांचे सचिव संदीप जगताप यांची तर आरसीसीच्या सचिवपदी तालुका मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष सिकंदर शेख यांची निवड करण्यात आली.
         विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली असून आरसीसी चे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि इतर सदस्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी  RCC चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. सुबोध मालपाणी व डिस्ट्रिक्ट अव्हेणु सेक्रेटरी रो. आनंद कुलकर्णी व को-डायरेक्टर रो. पार्श्वेन्द्र फरसोले, बारामती रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री अरविंद गरगटे, सचिव श्री रविकिरण खारतोडे व इतर सर्व सदस्य उपस्थित होते. 
याप्रसंगी RCC च्या २४-२५ वर्षा करीता कार्यकारणीची निवड झाली. अध्यक्ष श्री. संदीप जगताप , सचिव श्री सिकंदर शेख, खजिनदार श्री हेमंत तांबे, याप्रसंगी अध्यक्षपदाची कॉलर व इतर सदस्यांना RCC ची पिन देण्यात आल्या.

To Top