Baramati Breaking l आधी भिंतीवर आपटले, नंतर गळा दाबून नऊ वर्षाच्या पियुषचा बापानेच केला खून : बारामती तालुक्यातील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतोस तु तुझे आईच्याच वळणावर जावुन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत बापाने मुलाला भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील होळ येथे घडली आहे. 
           याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन गणेश भंडलकर, संतोष सोमनाथ भंडलकर सर्व रा.होळ ता.बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ जानेवारी रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास नऊ वर्षांचा पियुष घरात असताना वडील विजय गणेश भंडलकर हे घरात येऊन अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतोस तु तुझे आईच्याच वळणावर जावुन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत पियुषला भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबून खून केला.
            त्याची आई शालन गणेश भंडलकर यांनी सदरची घटना पाहुन देखील आपला नवरा विजय भंडलकर हा सदर कृत्य करताना त्यास प्रतिबंध केला नाही. व त्याच्या सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येवुन पडला आहे अशी खोटी माहिती दिली तसेच यातील संतोष भंडलकर याने देखील निरा येथील भट्टड डॉक्टर येथे पियुष यास घेवुन गेलेनंतर तेथे विजय भंडलकर यांचे सांगण्यानुसार पियुष यास चक्कर येवुन पडल्याचे खोटी माहिती दिली तसेच त्या तीघांनी भट्टड डॉक्टरांनी पियुष हा मयत झालेचे सांगुन डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमीक आरोग्य केंद्र येथे घेवुन जाण्यास सांगितले. त्यांनी संगनमताने जाणीवपुर्वक विजय भंडलकर याने पियुष यास त्याचा गळा दाबुन त्यास आपटुन जिवे ठार मारुन त्याचा खुन केला आहे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. व त्याबाबतचा पुरावा राहता कामा नये यासाठी त्याची बॉडी प्राथमीक आरोग्य केंद्र होळ येथे घेवुन न जाता पियुष याचे प्रेत गावी घरी घेवुन जावुन सदर मयताबाबत पोलीस पाटील,अगर इतर कोणालाही कळविले नाही. व त्यांनी त्याचे नातेवाईक बोलावुन घेवुन मयत पियुष विजय भंडलकर ९ वर्षे,रा.होळ ता.बारामती जि.पुणे याचा पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे पोस्टमार्टम न करता त्याची अंत्यविधी करण्याची तयारी केली होती. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत. 
To Top