सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर - कापूरहोळ मार्गावरील संगमनेर - माळवाडी ता.भोर येथील स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरच्या समोर कापूरहोळकडे जाणाऱ्या बाजारवाडी ता.भोर येथील एका दुचाकीस्वारास अज्ञात चोरट्यांनी अडवून आम्ही पोलीस आहोत तुमची तपासणी करायची आहे अशी बतावणी करून दुचाकीस्वराच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्यांनी पळ काढला.या घटनेत दुचाकीस्वाराचे ९० हजारांचे नुकसान झाले. त्याची फिर्याद राजगड पोलिसात सुरेश हवालदार राहणार बाजारवाडी यांनी दिली.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर कापूरहोळ मार्गावरील संगमनेर- माळवाडी येथील स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरच्या समोरून
सुरेश विठोबा हवालदार( वय -६२) सध्या रा. जैन मंदीर रोड, नाकोडा,पुणे 46, मुळ रा.बाजारवाडी, ता. भोर हे मंगळवार दि.१४ दुपारच्या वेळी कापूरहोळकडे जात होते.यावेळी पाठीमागून मोटर सायकलवर येणाऱ्या दोन अनोळखी चोरट्यांनी सुरेश हवालदार यांच्या मोटार सायकलला मोटार सायकल आडवी मारून बाबा आम्ही तुम्हाला आवाज देत आहे.तुम्हाला ऐकायला येत नाही का.त्यावेळी हेल्मेटमुळे आवाज आला नाही असे हवालदार यांनी अनोळखी इसमांना सांगितले.आम्ही पोलीस आहोत,भोरला काय झाले आहे हे माहीत आहे का? असे म्हणुन तुम्हाला आम्हाला चेक करावयाचे आहे असे सुरेश हवालदार यांना म्हटले.त्यानंतर ते दोन अज्ञात चोरट्यांनी हवालदार यांना चेक करत असताना त्यांच्या खिशातील पैसे व मोबाईल त्याचेकडील रूमालामध्ये ठेवण्यास सांगितला.यावेळी गळ्यातील सोन्याची चैन देखिल काढण्यास सुरेश हवालदार यांना काढण्यास सांगितली. गळ्यातील चैन काढण्यास नकार दिला त्यावेळी चोरट्यांनी सुरेश हवालदार यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची ९० हजार रुपयांची सोनसाखळी चिचकावून बोरच्या दिशेने धूम ठोकली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार औदुंबर अडवाल व मदने करीत आहेत.