Baramati Breaking l तांदुळवाडी येथे हायवा चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील तांदुळवाडी येथे एका हायवाने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुचाकीवर असलेला दूसरा विद्यार्थी जखमी झाला आहे.            या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. जुनेद राजू झारी असं या घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर त्याचा मित्र तुषार भिसे हा जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुनेद झारी आणि तुषार भिसे हे दोघेही येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावीत शिकत होते. आज दुपारी ते दुचाकीवरून महाविद्यालयातून घराकडे जात होते. त्यावेळी समोर आलेलेल्या डंपरने अचानक वळण घेतल्यामुळे दुचाकी थेट डंपरखाली गेली. यामध्ये जुनेद हा चिरडला गेला. 
डंपरच्या चाकाखाली आल्यामुळे जुनेदचा जागीच मृत्यू झाला. 
           या घटनेनंतर तुषारने डंपरचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो डंपर सोडून निघून गेला. दरम्यान, या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बारामती तालुका पोलिसांनी या डंपर चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरीक आणि नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
To Top