सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
दिवे (ता.पुरंदर) नजीक पवारवाडी येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय यशवंत पवार( वय ९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सूना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे. गुरुदत्त ट्रेडर्सचे मालक कुमार पवार, शेती व्यावसायिक राजेंद्र पवार, गृहिणी शशिकला सदाशिव राजिवडे ,उषा बाळासाहेब भामे यांचे ते वडील होत. तर आयटी व्यवस्थापक रोहित पवार, सचिन पवार यांचे ते आजोबा होत.