सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मर्गासणी दलित वस्ती योजनेतील रस्त्याच्या कामास सुरुवात करत नसल्याने येथील युवकांनी वेल्हे पंचायत समिती समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
मार्गासणी येथील दलित वस्ती जोडणारा रस्ता दलित वस्ती सुधार योजनेतून दोन लाख 65 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असुन गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू केले जात नाही. या रस्त्याच्या कामास स्थानिक व्यक्तीने हरकत दिली. ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक व सरपंच यांनी पाहणी करून खासगी मालकीची नसल्याचं स्पष्ट केलं असुन देखील रस्त्याचा कामास सुरुवात केली नाही. यासाठी येथील युवक राहुल कचरू रणखांबे पंचायत समिती समोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ आमरण उपोषणास बसलेले आहे. रस्त्याच्या कामास जोपर्यंत सुरुवात होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे राहुल रणखांबे यांनी यावेळी सांगितले.
------------------------
मार्गासनी येथील दलित वस्ती योजनेच्या रस्त्याची कामास सुरुवात न केल्याने बसलेल्या युवक राहुल रणखांबे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचा जाहीर पाठिंबा असल्याचे रिपाई चे अध्यक्ष कुंदन गंगावणे यांनी सांगितले तर भीम आर्मी संघटना पुणे जिल्हा यांचा देखील पाठिंबा असल्याचे अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी सांगितले