सुपे परगणा l सुपे कॉलेजमध्ये ग्राहक जागरूकता व वित्तीय साक्षरता कार्यशाळा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथील महाविद्यालयात ग्राहक जागरूकता व वित्तीय साक्षरता कार्यशाळेचे आयोजन येथील सावित्राबाई फुले विद्यापिठ अंतर्गत विद्या प्रतिष्ठान संचलित सुपे महाविद्यालय व मुंबई येथील कन्झ्युमर गाईडन्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
           यावेळी ग्राहक म्हणजे कोण ? ग्राहकांचे अधिकार, कर्तव्य तसेच ग्राहक म्हणून फसवणूक झाल्यास दाद मागण्यासाठी उपलब्ध असलेल्या ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा याबाबतचे मार्गदर्शन कन्झ्युमर गाईडन्स सोसायटीचे प्रकल्प व्यवस्थापक तिर्थराज पांडे यांनी केले. तर आर्थिक विश्लेषक नंदकुमार मेनन यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्व, वित्तीय गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेले विविध पर्याय तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरी किंवा व्यवसाय प्रारंभ केल्यापासून त्वरित वित्तीय गुंतवणूक करावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. 
         याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काळे, कार्यशाळा समन्वयक प्रा. दत्तात्रय शिंदे, गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.अमोल भोसले तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका चांदगुडे यांनी केले. तर आभार प्रा. आरती वाबळे यांनी व्यक्त केले. 
               ..................................

To Top