Baramati News l सुनील जाधव l इतर औषधे घ्या..तरच युरिया बॅग देतो ..ती पण बिगरपावतीची जादा दराने ! वडगाव निंबाळकर मध्ये युरियाचा काळाबाजार ?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर :  सुनील जाधव
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात कृषी सेवा केंद्र वर युरियाचा काळाबाजार पाहिला मिळत आहे. 
         कृषी सेवा केंद्रावर युरिया हा वाढीव दरात विक्री होताना पाहायला मिळतेय. युरिया खरेदी केल्यानंतर  शेतकऱ्यांना पावती देण्यास नकार होत आहे. सर्वसामान्य शेतकरी कृषी सेवा केंद्रावर युरियाची मागणी करत आहे, मात्र कृषी सेवा केंद्रावर वाढीव रक्कम घेतली जात आहे. किंवा इतर खते औषधे घेण्यास, शेतकऱ्याला जबरदस्ती केली जात आहे. युरिया काही ठिकाणी शिल्लक असूनही शिल्लक नाही असे उत्तरे सांगण्यात आले आहेत. गहू,मका,कांदा इत्यादी पिकाला युरिया लागत असल्यामुळे युरियाची मागणी होत असताना शिल्लक एरिया असूनही तुटवडा का? तसेच युरियाची मनमानी किमतीला विक्री होत असतानाही अधिकारी गप्प का असा सवाल शेतकरी मित्र करत आहेत.
             याबाबत संबंधित विभागाला विचारपूस अथवा तक्रार केल्यास टोलवाटोलवीची उत्तरे शेतकऱ्यांना मिळत आहेत. कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दुकानदारांची तक्रार देऊनही अधिकारी शांत का बसतात असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी विचारात आहे. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
To Top