सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी(ता. बारामती ) ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर संपत चव्हाण यांच्याविरुद्ध दहा सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने संमत झाला. दरम्यान सोमवार दि. ६ रोजी सदस्य मंडळाच्या मासिक सभेत उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.
बुधवार (दि. १) रोजी तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी सरपंच गीतांजली जगताप, तलाठी संजय खाडे, ग्रामसेवक विजय चव्हाण यांच्यासह सदस्य उपस्थित होते. चव्हाण यांना पदावरून हटवण्याबाबत ग्रामपंचायतचे सदस्य सतिश गोरख जगताप यांनी बारामतीचे तहसीलदार यांचेकडे दहा सदस्यांचा सह्यांचे निवेदन दिले होते. सदस्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार गणेश शिंदे यांनी उपसरपंच सागर चव्हाण यांच्या विरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर केला. यावेळी सदस्य सतीश जगताप, रविराज जगताप, अजित भोसले, रमेश घाडगे, वनिता कोकरे, मंगल मुळीक, उजमा शिकीलकर, मयुरी पवार, सोनाली निकम, शारदा जाधव, वंदना चौगुले या दहा ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनावर सह्या केलेल्या आहेत. या निवेदनाची तहसीलदार यांनी तातडीने दखल घेत १ जानेवारीला सदस्यांबरोबर बैठकीचे आयोजन केले होते.