सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष धायगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी येथे सन २०२१ साली झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये श्री सोमेश्वर जनशक्ती पॅनेलचे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले होते ठरल्याप्रमाणे यापूर्वी भाग्यश्री धनंजय गडदरे,अजित विलास लकडे, ऋती महेश मदने यांची सरपंच पदी निवड झाली होती, ऋती महेश मदने यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निवडणूक निर्णय अधिकारी कंरजेपुल सर्कल अजित मोहिते यांच्या उपस्थितीत संतोष उत्तम धायगुडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी सोमेश्वर चे संचालक लक्ष्मण गोफणे, सोमेश्वर चे माजी व्हॉइस चेअरमन वसंत मदने, युवा नेते धनंजय गडदरे हे पॅनेलप्रमुख उपस्थित होते, उपसरपंच मंगल ठोंबरे, सदस्या मनिषा फरांदे ग्रामस्थ रामभाऊ लोंखडे, हनुमंत लकडे, अतुल लकडे, विराज मदने, तसेच खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच, सदस्य, सोसायटी माजी चेअरमन,व्हा चेअरमन, सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी निवडणूक कामे निंबुत तलाठी जयश्री तनपुरे , ग्रामविकास अधिकारी सीमा गावडे, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच पदी निवड झाल्याबद्दल संतोष उत्तम धायगुडे यांनी गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले, तसेच आपल्या गावच्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन गावाचा विकास करेल असे सांगितले व खंडोबाची वाडी हे गाव आदर्श गाव करील हि ग्वाही दिली.