पुरंदर l महात्मा गांधी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
निरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
       शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अनेक स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते.
 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे स्नेहसंमेलन महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य लक्ष्मणराव चव्हाण हे होते.
 कार्यक्रमांमध्ये शिवाजी महाराजांवर पोवाडे सादर करण्यात आला. तसेच आदिवासी नृत्य,कोळीगीत आणि उद्बोधन पर नाटिका सोशल मीडियाचा अतिवापर टाळा असे अनेक दर्जात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.
 याप्रसंगी पंचक्रोशीतील पत्रकार बांधव यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार भरत निगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य संतोष गांधी, कन्या विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती निर्मला नायकोडी ,पत्रकार बाळासाहेब ननवरे,अमोल साबळे,  सुभाष जेधे स्वप्निल कांबळे,मोहम्मदगौस आतार, विजय लकडे, आदी मान्यवर  उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन  कोकरे यांनी केले. सूत्रसंचालन संजय माळी व संगिता रासकर यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार विनय तांबे यांनी मानले.
To Top