सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-खंडाळा तालुक्याच्या हद्दीवरील नामांकित असलेले अभिनव इंजीनियरिंग कॉलेजला एका बँकेने मागील ५ दिवसांपूर्वी सायंकाळची वेळी सील ठोकल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.कॉलेज व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना कॉलेज बंद झाल्याने घरी पाठवल्याची माहिती स्थानिकाकडून देण्यात आली.
कॉलेजमध्ये १ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यातील ५०० विद्यार्थिनी व ३६० विद्यार्थी होस्टेलला राहत होते.तर इतर विद्यार्थी भोर - खंडाळा तालुक्यातीलच जवळपासच्या गावांमधील असल्याने दररोज कॉलेजला येऊन- जाऊन करत असतात.सध्या दोन दिवसांपासून कॉलेज बंद झाल्याने विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हातोडा पडल्याचे पालकांकडून बोलले जात आहे.कॉलेज बंद झाल्याने कॉलेज व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना घरी पाठवले खरे मात्र शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांना घरी परतताना अश्रू अनावर झाले होते.
अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या या इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या सहा शाखा, डिग्रीच्या पाच शाखा आणि इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.१७ जानेवारी रोजी इंजिनिअरींगच्या परीक्षा कशा होणार ? यापुढे शिक्षण बंद होणार का? या विचारामुळे काही विद्यार्थी डोळ्यात अश्रू घेऊन हॉस्टेलच्या बाहेर पडले. २००९ पासून सुरू असलेल्या या महाविद्यालयात महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. सद्यस्थितीत ४ लाख १९ हजार स्वेअर फूटाचे बांधकाम असून कॉप्युटर व इतर साहित्य मिळून सुमारे १०० कोटींची मालमत्ता आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वडवाडी कॅपसमध्ये सध्या जमीन आणि कॉलेजच्या इमारती मिळून सुमारे १३२ कोटींची मालमत्ता आहे