सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर धावत्या ट्रक्टरवरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सोमेश्वरनगर येथे आप्पासाहेब जगताप नगर येथे करंजेपुल- वाणेवाडी रस्त्यावर ही घटना घडली. सांगसिंग दिपसिंग सिंग सद्या राहणार करंजेपुल ता. बारामती जि. पुणे मूळ राहणार पद्रोडा ता. भनियाना जि. जैसलमेल (राजस्थान) हा तरुण या अपघातात मृत्यूमुखी पडला आहे. सांगसिंग हा या भागात फर्निचरचे काम करत होता. करंजेपुल कडून वाणेवाडी कडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला त्याने लिफ्ट मागून तो कामानिमित्त वाणेवाडीच्या दिशेने निघाला होता. आप्पासाहेब जगताप नगर जवळ आल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो डांबरी रस्त्यावर पडला व ट्रॅक्टर च्या मागे असणाऱ्या दोन्ही ट्रॉलीचे चाके त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह फरार झाला असून करंजेपुल पोलीस त्याचा शोध घेत आहेत.