बारामती l निधन वार्ता l युवराज पिसाळ यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ-सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील राष्ट्रपतींच्या हस्ते अखिल भारतीय ऊस स्पर्धेत पुरस्कार मिळालेले शेतकरी युवराज रामचंद्र पिसाळ (वय ७१) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. अजित विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे ते पंधरा वर्ष अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष होते.
 १९७४ साली युवराज पिसाळ यांना तत्कालिन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली महंमद यांच्या हस्ते अखिल भारतीय ऊस स्पर्धेत आडसाली व सुरू अशा दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. 
सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक विनायक पिसाळ यांचे ते धाकटे बंधू होत.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. 
---
To Top