सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील उपजिल्हा रुग्णालयासह पोलिस स्टेशन आणि बाजार समितीची संरक्षण भिंत तसेच रस्ता आदी विविध विकास कामे सुरु आहेत. ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण करता यावीत याकडे लक्ष द्यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी दिले.
पवार यांनी सुपे येथील उपजिल्हा रुग्णालय, पोलीस ठाणे इमारत, बाजार समितीकडील रस्ता व सरंक्षण भिंत, काऱ्हाटी येथील कऱ्हा नदीवरील पुलाची रेखा (अलाईनमेंट) निश्चित करणे आदी विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाची सुमारे ३० कोटी खर्चाची असुन ६ हजार ८५५ चौरस मिटरचे बांधकाम आहे. येथील रुग्णालयाचे बांधकाम लातुर येथील स्पेस मॅजिक कन्सल्टंट कंपनी करीत आहे. या कंपनीच्या माध्यमातुन राज्यात सुमारे ४०० कोटी खर्चाच्या सात रुग्णालयांची कामे सुरु आहेत. यामध्ये सुप्यासह पुणे ( औंध ), सोलापुर, उस्मानाबाद ( धाराशीव ), बीड, लातुर, गोंदीया येथे कामे सुरु असल्याचे आर्किटेक कृष्णकुमार बांगड यांनी दिली.
येथील तळघर इमारतीत वाहनतळ धरुन चार मजली आहे. येथील वाहतळात १६ चारचाकी वाहणे, ३० दुचाकी, सर्व्हीस रुम कामगार रुम आणि ओला सुका कचरा विभाग. तर दुसऱ्या तळमजल्यावर विलगीकरण कक्ष, एचडीओ, शस्त्रक्रिया कक्ष, तात्काळ विभाग, सार्वजानिक विभाग, एक्स - रे विभाग, लेबर विभाग, लॅब, पोलिस आपात्काल कक्ष. तर पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रिया विभाग, इलेक्ट्रिकल कक्ष, माता आणि बाळ कक्ष, नेत्रचिकित्सा कक्ष, महिला सर्जिकल वार्ड, प्रे आणि पोस्ट ओटी, आणि दुसऱ्या मजल्यावर जळीत रुग्ण विभाग, क्षयरोग कक्ष, डायलेसीस कक्ष आणि पुरुष सर्जिकल वार्ड असे कक्ष असल्याचे बांगड यांनी सांगितले.
सुपे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत, रस्ते, मुख्य दरवाज्याचे बांधकाम सुरु करावे. सुपा पोलीस ठाण्याच्या मुख्य दरवाजाचे कामे करताना मुख्य इमारतीचा उंचीचा विचार करण्यात यावा. सुपे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून प्रशासन आणि नागरिकांनी जागा निश्चित करावी असे पवार यांनी सरपंच तुषार हिरवे आणि उपस्थित ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, सचिव अरविंद जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मुंडे आदी उपस्थित होते.