सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील तसेच बोअर वरील विद्युत मोटारा चोरणाऱ्या सराईत सहा जणांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून तब्बल ३ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ही कारवाई लोणीभापकर तसेच सायंबाचीवाडी परिसरात केली.
पोलिसांनी ओंकार राजेश आरडे वय-२५, महेश दिलीप भापकर वय ३१ सर्व रा. लोणीभापकर अमोल लहु कदम वय-२८ रा. जळकेवाडी ता. बारामती, निलेश दत्तात्रय मदने वय-२८ रा. लोणीभापकर,प्रथमेश जालिंदर कांबळे वय-२२ रा.लोणीभापकर ता. बारामती या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून इलेक्ट्रीक मोटार चोरी केलेले १७ गुन्हे उघड झाले आहेत.