सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस बागायती शेतीचे क्षेत्र वाढत आहे. व कांदा हे पीक प्रामुख्याने शेतकरी करतात. उसाबरोबरच कांदा हे पीक दुय्यम रित्या घेतली जाते. सध्याच्या परिस्थितीत आम्ही काही ठिकाणी पाहणी केली असता, पारंपारिक पद्धतीने लावला जाणारा कांदा यामध्ये मोठा बदल झाला आहे.
विशेषतः बेडवरती कांदा लागवड करण्यास अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. याप्रकारे कांदा लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन सुद्धा वाढते, त्याचबरोबर आर्थिक मोबदला सुद्धा अधिक मिळत असल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या बोलण्यातून जाणून आले. इंदापूर तालुक्यात यापूर्वी कांद्याचे शेत्र कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती. परंतु एरव्ही यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. अधिक प्रमाणात बेडवर कांदा पीक घेण्यास अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. आम्ही डाळच क्रमांक 2 येथील शेतकरी कुणाल अजिनाथ जगताप यांच्या कांदा पिकाची पाहणी केली, त्यावर ती पाहिले असता उत्कृष्ट रित्या कांदापिक आल्याचे दिसून आले. याबाबत कुणाल जगताप यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, गादीवापर पद्धतीने कांदा लागवड होत होती. परंतु आम्ही त्यास फाटा किंवा बगल देऊन कांदा पिकाची लागवड यावर्षी बेड पद्धतीने केली आहे. यातून आम्हाला उत्पन्न वाढीस प्राधान्य मिळणार असून एकास एक कंद्याचे उत्पन्न निघेल. तसेच हे कांदा पीक ड्रीप द्वारे होणार असल्याने पाण्याची सुद्धा बचत होणार आहे असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांना पुन्हा विचारले असता त्यांनी सांगितले की, हवामानात सतत बदल होत आहे. सध्या कांद्याला पोषक असणारे थंडीचे वातावरण कमी होत असल्याने कांद्याची एकसारखी साईज होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही बेडवरील कांद्याचा प्रयोग केला आहे. त्यामुळे निश्चितच उत्पादन वाढीस मदत होणार असेही त्यांनी शेवटी सांगितले. कुणाल जगताप हे bsc agri आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा कांदा पिकाच्या अशा लागवडीचा अवलंब करून उत्पादन वाढवावे . याबाबत आम्ही तालुक्याच्या पश्चिम भागातील कांदा उत्पादनाबाबत जाणकार असणारे शेतकरी जगन्नाथ खटके यांच्याशी सुद्धा संवाद साधला. त्यांनी सुद्धा सांगितले बेड वरील कांद्या पिकामुळे पाण्याची बचत होते, खतांचा खर्च सुद्धा कमी प्रमाणात येतो. गादी पद्धतीने कांदा लागवड केल्यास हाताने खत फेकावे लागते. परंतु या पद्धतीचा अवलंब केल्यास ड्रिपद्वारे खताची मात्रा कांदा पिकाला जाते. यातून कांद्याला पोषक अशा प्रमाणात सर्व पद्धतीची मात्रा मिळत असल्याने कांदा पिकाचे भरघोस उत्पादन निघते. त्यामुळे खरोखरच अशा शेतकऱ्यांचा सल्ला घेऊन कांदा पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. हे मात्र तितकेच खरे.