Baramati News l निंबुतच्या रुपाली काकडे यांना राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार प्रदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
निंबुत ता. बारामती येथील रुपाली शिरीष काकडे यांना
राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार २०२५ देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
           राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त  वारजे मधील पालकत्व फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार २०२५ यावर्षी निंबुतच्या रुपाली काकडे यांना मानपत्र व सन्मानचिन्ह  प्रदान करण्यात आले.
           पालकत्व फाउंडेशन तर्फे ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घडवले अशा मातांना मानपत्र सन्मानचिन्ह आणि ग्रंथतुला करून त्यांचा गौरव केला जातो.  गेली सहा वर्ष हा उपक्रम चालू असून यावर्षी या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे. कार्यक्रम रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५  रोजी सकाळी अकरा वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाला आहे.
       पालकत्व फाउंडेशन तर्फे यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या यशस्वी लोकांच्या मातांचा राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. सकाळचे पत्रकार योगीराज प्रभुणे यांच्या मातोश्री, पॅरा-ऑलंपिक खेळाडू सचिन खिलारी यांच्या मातोश्री, कोरोना मधील देवदूत खासदार निलेश लंके यांच्या मातोश्री ,  शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून शिव विचारांचे प्रचार करणारे विनोद जावळकर यांच्या मातोश्री, सरहद च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे संजय नहार सर यांच्या मातोश्री,सामाजिक  क्षेत्रात अग्रेसर असणारे निलेश गिरमे यांच्या मातोश्री राधिका दशरथ गिरमे, तृप्ती मधुकर कदम, सहकार कामगार रुक्मिणी पांडुरंग ढगे, ससून रुग्णालयातील डॉक्टर मानसिंग  साबळे यांच्या मातोश्री उद्योजक  व्यंकटेश वासुदेव मांडके यांच्या मातोश्री, शिक्षिका रुपाली शिरीषराव काकडे,पुण्यातील सामाजिक संस्था विद्यार्थी सहाय्यक समिती, मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कल्पना वरपे अशा अनेक मातांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आला. पालकत्व फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम ननवरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. नासिर इनामदार यांनी मानपत्र वाचन केले. विराज देशमुख यांनी सूत्रसंचालन व ऐश्वर्या कुमकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
To Top